विध्यार्थी हिताच्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करा



 ११ मार्चच्या विशेष सिनेट सभेत डॉ. मनीष गवई होणार विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक होणार


विध्यार्थी हिताच्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करा -डॉ. गवई


अमरावती- (प्रतिनिधी)-भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवादूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ.मनीष शंकरराव गवई हे आगामी ११ मार्चच्या  होऊ घातलेल्या विद्यापीठाच्या  वार्षिक सिनेटच्या सभेत विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक होणार असून विद्यार्थी हितांच्या विविध प्रस्ताव व  प्रश्नावर सभागृहात चर्चा घडवून ,विद्यार्थी प्रश्नावर सभागृहाला निर्णय घेण्यासाठी व निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी  भाग पाडणार आहे.

विशेष करुन विद्यार्थी विकासाशी संबंधित  महत्वपूर्ण चर्चा ते या अधिसभेत घडविणार आहे. विशेष म्हणजे सिनेट सभेचा कार्यकाळ संपत असल्याने ही सिनेटची शेवटची सभा असून ही  सिनेट सभा 'फॉर्मालिटी' असेल तर मी सभेत सहभागी होणार नाही असा इशारा देखील डॉ. गवई यांनी दिला आहे त्यामुळे ११ मार्चची  सिनेट सभा गाजणार असून सभेत डॉ. मनीष गवई होणार विद्यार्थी प्रश्नावर होणार आक्रमक आहेत. यासोबतच निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची लक्ष्यवेधी  डॉ. गवई सभेत मांडतील. 

महाराष्ट्र राज्य नव्या विद्यापीठ कायद्यानुसार संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्या सिनेटची सभेचे गठन करण्यात आले आहे. विद्यापीठ व शैक्षणिक वर्तुळातील प्रश्न सोडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सिनेटसद्स्यावर असते. सिनेटची सभा विद्यापीठ व विद्यार्थी हिताला जोपासण्याचे काम करीत असते. या सभागृहात विविध सवर्गातून प्रतिनिधित्व दिल्या जात असते. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणुनडॉ. मनीष गवई यांची  निवड करण्यात आली असल्याने सिनेटच्या सभेतविद्यार्थी प्रश्नावर विद्यापीठाचे लक्ष्य केंद्रित करण्याची भूमिका त्यांच्याअसते. 

आगामी ११ मार्चला होऊ घातलेल्या विद्यापीठाच्या  वार्षिक सिनेट सभेत डॉ मनीष गवई विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक होणार असून विध्यार्थ्याना जास्तीत जास्त अभ्यास करता येईल यासाठी विद्यापीठामधील इमारतीचा  विध्यार्थ्यासाठी भाडे तत्वावर 24 तास वाचन कक्ष सुरु करण्यात यावे,  विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये लैंगिक छळ व रैगिंग प्रतिबंधाबाबत, महिला सुरक्षेसंदर्भात समित्यांचे गठन करण्यात यावे,  परीक्षा पद्धतीच्या गोंधळाबाबत व परीक्षेचा उशिरा लागणारा निकाल यावर विद्यापीठाने आकृतिबंध तयार करावा व नॅक मानांकन वाढविण्यासाठी कार्यनियोजन तयार करावे,विद्यापीठाने युवा महोत्सव व छात्र संसदेचे तात्काळ आयोजन करावे, विध्यार्थी विम्याच्या  विशेष प्रस्तावावर  तात्काळ कार्यवाही करावी,विद्यापीठाने बाहेरून निधी जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, बाह्य स्रोताने विद्यापीठाच्या सीएसआर निधीमध्ये वाढ करावी ,एन सी सी बेस्ट कॅडेट अवॉर्ड व एन सी सी अभ्याक्रमात तात्काळ लागू करावा, भारताच्या सविधानाच्या उद्देश्पत्रिकेचा समावेश विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्रवेश पुस्तिकेमधे करावा या सर्व विद्यार्थी प्रश्नावर सभागृहाचे लक्ष्य वेधले जाणार असून यातून निर्णय घेण्यासाठी कुलगुरुना भाग पाडल्या जाणार आहे.

 याशिवाय  विद्यापीठातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या  पदोन्नतीबाबतचा महत्वपूर्ण प्रश्न देखील ते या सभेत मांडणार आहे. या सभेत मुख्य करून २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाज आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात येईल व सोबतच २०२०-२१ चा मराठी इंग्रजी वार्षिक अहवालास देखील या सभेत मान्यता देण्यात येईल. विशेष म्हणजे ही सिनेटची शेवटची सभा असून ही  सिनेट सभा 'फॉर्मालिटी' असेल तर मी सभेत सहभागी होणार नाही असा इशारा देखील डॉ. गवई यांनी दिला आहे. रासेयो संचालक डॉ राजेश बुरंगे यांनी डॉ गवई यांना अपमान व धमकावणे प्रकरणी देखील चांगलेच गाजणार आहे. विद्यापीठाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कार्यप्रणालीबाबत डॉ गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.       

            यासोबत  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा प्रमाणपत्र अभ्याक्रम तात्काळ  सुरु करण्यात यावा  व  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत अधिसभेत डॉ. मनीष गवई मागणी करणार आहे.एकंदर विद्यापीठाच्या प्रत्येक सिनेट सभेत मनीष गवई सर्वात जास्त आक्रमक होणार असून त्यांनी विद्यार्थी हितांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहेत. विशेष म्हणजे सिनेट सभेचा कार्यकाळ संपत असल्याने सभेवर सर्वांचे लक्ष्य लागून आहे.      

Post a Comment

0 Comments