....... नुसतं पत्रकारच नव्हे तर कृतिक पत्रकारिता आणून त्याला सामाजिक कार्याची जोड देणारा कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून संतोष शेंडे यांच्याकडे पाहाव असे वाटते, कारण एखादी समस्या सोडवण्यासाठी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्धी देऊन ती प्रशासनापर्यंत पोचविणे, त्याचा पाठपुरावा करणे कोणती समस्या सुटेपर्यंत त्याच्यामागे मागे लागणे हा संतोष शेंडे यांचा चा खरा स्वभाव आहे.
हा पत्रकारितेचा वारसा त्याला त्याच्या उघडल्यापासून लाभला टाकरखेडा संभु सारख्या छोट्या गावात सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेल्या संतोषने खेळन्याच्या वयात दररोज पहाटे उठून अमरावती वरुण पेपर विकत आनने आणि गावात येऊन ते वाटप करुण आपल्या वडीलांच्या व्यवसायाला मदत करण्याला सुरुवात केली , लहानपना पासून चंचल वृत्तीतून असलेल्या संतोषने या वृत्तपत्राच्या व्यवसायात रेकॉर्ड करण्याचा मानस व्यक्त करीत आतापासून 25 वर्षपूर्वी तब्बल जिल्ह्यातील 30 ते 35 गावंमध्ये पेपर पोहचविला, अगदी लहान वयात अमरावती एसटी डेपो मधील त्या काळातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर बसून पेपर विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय सुरू झाला ,एसटी डेपोतील चौकशी ऑफिस मध्ये पेपरचे पार्सल सकाळीच बांधणी करणे, त्या त्या ठिकाणच्या बसेस वर पाठवणे, सगळ्या नित्यनेम संतोष शेंडे यांचा सुरू झाला , त्यातूनच असे करता करता टाकरखेडा संभु येथे वडील अशोकराव शेंडे यांची पेपर एजन्सी चालविणे, प्रत्येक घरोघरी पेपर वितरित करून मोठ्या प्रमाणात पेपर विक्रीचा व्यवसाय वाढविला, त्या काळामध्ये पेपरच्या बातम्या लोकांसाठी फार महत्त्वाचा विषय होता, कारण त्यावेळी फारसे तांत्रिक साधन नव्हते, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट , या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतः पत्रकारिता उभी केली, पत्रकारितेमध्ये नाव उभे करणे हा त्याचा मानस होता, नुसती पत्रकारिताच नाही तर सामाजिक दायित्व म्हणून यातून न्याय देण्याची भूमिका होती, आपले गावच नाही तर परिसरातील गावांमधील प्रत्येक समस्या पेपर च्या माध्यमातून सोडविन्याचा प्रयत्न केला आहे, पत्रकारिते मधील अन्यायाचा विरुद्ध न्याय देणारी लढाईमुळे सामान्य जनतेच्या समस्या संतोष शेंडे यांच्या घरापर्यंत पोहोचू लागल्या आणि त्या सोडवण्या मध्ये संतोष शेंडे याला आनंद येतो, एखाद्या अधिकाऱ्याने जर एखाद्या सर्वसामान्यांची अडवणूक केली की संतोष लगेच अधिका-याला फोन लावून ,साहेब त्या समस्या मध्ये काय अडचण आहे आपण का बरं त्या माणसाचे काम थांबवले, असा दम भरला की त्या सर्व सामान्य माणसाचे काम अतिशय तातडीने झालेच पाहिजे, सर्व लोकांना राजकीय लोकांपेक्षा ही प्रिय वाटणारा संतोषने आत्म निर्भर होत नोकरी करणा-यालाही लाज वाटेल असा आपल्याच व्यवसायाला जोड़ देत, दूध ,ब्रेड, दही ,पनीर,श्रीखंड ची एजंसी सुरु केली,यातूनच तो आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात.
अतिशय जमिनीवरची पत्रकारिता जर बघायची असेल ,तर ती म्हणजे संतोष शेडे यांची, सर्वसामान्यांच्या ज्वलंत मुद्द्याला लिखाणाची धार देऊन त्याला बातम्यांचे स्वरूप देऊन प्रकाशित करण्याचा जो सपाटा संतोष शेंडेनी लावला त्याने संपूर्ण पत्रकारितेत जिल्हाभरात संतोष शेंडे ची ओळख , व प्रतिभा निर्माण झाली, याचमुळे त्यांच्याकडे आज मराठी पत्रकार संघाची भातकुली तालुका अध्यक्ष, व सरपंच संघटनेचे प्रदेश मीडिया प्रमुख जबाबदारी संभाळत आहे,तर त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे,आज त्यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांना खुप खुप शुभेच्छा.
0 Comments