ध्येयवेड्या संशोधकाने घेतला तीन खंडात्मक लिखाणाचा ध्यास..
बुलडाणा : छत्रपती शिवरायांचा जिवनपट शब्दबध्द करणे सोपे काम नाही. अनेक संशोधकांनी यात हयात घालविली. मात्र मर्यादित स्वरुपाचे लिखाण या पलीकडे ते जाऊ शकले नाही. शिवपूर्वकाळ, शिवजन्म आणि शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण आलेख प्रथमच पुस्तक रुपाने बाहेर येणार आहे. बुलडाण्याच्या एका ध्येयवेड्या संशोधकाने हे शिवधनुष्य पेलण्याचा विडा उचलला असून शिवचरित्रावरील तीन खंडात्मक लिखाणाला सुरुवात केली आहे. त्यातील बराचसा भाग लिहून झाला आहे. प्रमोद टाले असे या ध्येयवेड्या संशोधकाचे नाव असून ते जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांनी हजारो पुस्तके आतापर्यंत जमविली असून मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयही ते बुलडाण्यात साकारत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धगधगता इतिहास. शिवचरीत्र भारतीयांना संघर्षाची प्रेरणा देत आले आहे.म्हणूनच बखरकारांपासून कवीभुषण कृष्णराव केळूस्कर, रा.सी.बेंद्रे सेतू माधव पगडी, शजवळकर, राजवाडे, रानडे, सरकार, पुरंदरे यांच्यापासून कॉ.शरद पाटील, कॉ.गोविंद पानसरे, जयसिंगराव पवार, शरद जोशी, संतोषराव बाहेकर शिवचरीत्र लेखकांनी आपआपल्या परीने शिवचरित्र रेखाटले. शिवचरित्राची साधने रेखाटली. कथा, कादंब-यांनी खूप मोठे लिखाण झाले. आता प्रमोद टाले या व्यासंगी वाचक, संशोधकाने त्यात नव्यानं भर घालून संपूर्ण इतिहास तीन खंडांमध्ये लिखाणाचा ध्यास घेऊन काम सुरु सुरु केले. त्याचा बरासचा भाग लिहून तयार झाला आहे.
मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय..
मराठा इतिहासाची साधने, पुस्तके, शस्त्र, नानी, शिवकालीन पत्रे, सनदा, आदी साधनांचे प्रमोद टाले यांनी जतन केले आहे. शिवचरित्रावरील तीन हजार पुस्तकांचा खजानाच टाले यांनी संग्रहित केला आहे. जुने दुर्मिळ ग्रंथांनी त्यांचे दालन समृध्द झाले आहे. अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांना वाचकांसाठी हा ठेवा उपलब्ध करावा, अशी गळ घातलजी असता मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयात रुपांतर करणार असल्याचे प्रमोद टाले यांनी सांगितले.
0 Comments