टाकरखेडा संभु येथील नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात शिवजयंती उत्साहात साजरी
टाकरखेडा संभु (वार्ताहर) संतोष शेंडे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका अध्यक्ष पत्रकार संतोष शेंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संजय पिंगळे,वृजेश सवाई,गणेश कावरे,रमेश कोठार हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जामठे यांनी केले.संचालन संजय पिंगळे तर आभार विक्की बांन्ते यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने चौक दणाणून गेला होता.
या कार्यक्रमाला दिनेश मेश्राम,वैभव भुजाडे ,संदिप फरकुंडे,अमोल मेश्राम,नंदकिशोर हबर्डे,राजेंद्र लाडे,राजेश कोठार,भूषण पिंगळे,राजकुमार कावरे,ज्ञानेश्वर लाडे,प्रभाकर लाडे,श्याम कोठार,निखिल काळे,रुपेश लांडगे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार कातोरे,ओम पिंगळे,जय पिंगळे,रोशन कावरे,हर्षल कावरे,मयूर पिंगळे, कुणाल शेंडे,सागर मेश्राम,पियुश कावरे, अक्षय शेंडे, अथर्व लांडगे, पार्थ पिगंळे,आयुश कोठार,संतोष मने,दादु सोंळके सह नेताजी क्रीडा मंडळाच्या सदस्य मंडळींनी परिश्रम घेतले. यावेळी गावकरी मंडळी सह नेताजी मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
0 Comments