टाकरखेडा संभू (वार्ताहार) संतोष शेंडे
स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वलगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण दिसले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून वलगाव मध्ये शिवजयंती उत्सव समिती वलगाव शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ यांच्या तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वलगाव श्रीराम चौक येथे जगदंब ढोल ताशा पथक अमरावती व भव्यदिव्य महाआरती,छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ची पूजा करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन प्रहार जिल्हा प्रमुख मा.श्री.छोटु महाराज वसु,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.गजाननभाऊ राठोड,मा.श्री.मुन्नाभाऊ वसु,सरपंच मा.सौ.मोहिनीताई मोहोड,मा.श्री.दिनेशभाऊ कुऱ्हेकर,मा.श्री.सुधीरभाऊ उगले,हरिषभाऊ लांडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.या कार्यक्रमाकरीता शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख,कार्तिक वसु,अंकुश कळसकर,सागर काटोलकर,श्रीजित दिवाण,तेजस वेरुळकर,ऋषिकेश अंबाडकर,सुचित भुम्बर, कुलदीप किलोर,किशन कडु,रजत निर्मळ,शंतनु हगोने,योगेश तायडे,रोहित धानोरकर,अतिष वानखडे,हर्ष हगोने,आदित्य वसु,ऋषिकेश म्हाला,संकेत ठाकरे,गोपाल डहाके,जय धर्माळे, आयुष पोळगे,ऋषिकेश राणे,यश शेरेकर,ललित काटोलकर, सुमित लांडे व आदी उपस्थित होते.
0 Comments