अमरावती (प्रतिनिधी)- श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयात ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. १० मार्चला सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक मुठ्ठी अनाज’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
तक्षशिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सामाजिक शास्त्रे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा २०१९ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येते. ‘एक मुठ्ठी अनाज’ या संकल्पनेतून जे धान्य जमा होते ते गरजूंना दिल्या जाते. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी दरवर्षी जितके शक्य असेल तितके धान्य गोळा करतात. यामध्ये, गहू, ज्वारी, तांदूळ, दाळ इत्यादी धान्यांचा समावेश आहे. ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रम १० ते १५ मार्चपर्यंत सुरू राहील. या उपक्रमाची सुरूवात २०१९ साली झालेल्या स्नेहसंम्मेलनात डॉ. अंजली वाठ यांच्या संकल्पनेतून झालेली होती. त्या दरवर्षी पुढाकार घेऊन आजही हा उपक्रम अविरतपणे चालवित आहे.
१० मार्चला सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित सर्व महाविद्यालयात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्या जाते. यंदा ‘एक मुठ्ठी अनाज’ या उपक्रमाची सुरूवात संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस. राव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पडवाल मल्लू यांच्या उपस्थितीत केल्या जाणार आहे.
0 Comments