आरोग्य महायज्ञ शिबीराचे आयोजन !



 देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न ! 


मोर्शी येथे २ व ३ एप्रिल रोजी आरोग्य महायज्ञ शिबीराचे आयोजन ! 


मोर्शी तालुका प्रतिनिधी  मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून नागरिकांना तपासण्या करता याव्यात, नागरिकांना विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मार्गदर्शन मिळावे, रुग्णांचा ईलाज व्हावा, निःशुल्क शस्त्रक्रिया व्हाव्या या उद्देशाने आरोग्य महायज्ञ शिबिराचे आयोजन ३ एप्रिल व ४ एप्रिल रोजी मोर्शी तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, बालरोग तज्ञ, डोळे तपासणी, कान नाक घसा, स्त्री रोग तज्ञ, बालकांच्‍या विविध आजारांबाबत तपासण्‍या व उपचार केले जाणार असून मोर्शी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गावातील ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्याकडे नोंदणी करून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये तपासणी करून तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. 
या शिबिराचा तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधेचा फायदा व्हावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथील तहसील सभागृहामध्ये आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराची आढावा बैठक आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 
 त्यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे, गट विकास अधिकारी रवींद्र पवार, रोशन दारोकर, विपुल हिवसे, शेर खान, घनश्याम कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, रुग्णसेवक राधेश्याम पैठणकर, डॉ सचिन कोरडे, मोर्शी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधेचा फायदा व्हावा यासाठी आरोग्य महायज्ञ शिबिराचे आयोजन केले असून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, बालरोग तज्ञ, कान नाक घसा, स्त्री रोग तज्ञ, डोळ्यांचे विकार, अस्‍तीरोग, ह्रदयविकार, बालकांच्‍या विविध आजारांबाबत तपासण्‍या व उपचार व शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहेत. मोर्शी तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहून या आरोग्य महायज्ञ शिबिराचा लाभ घ्यावा -- आमदार देवेंद्र भुयार

Post a Comment

0 Comments