महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातुन आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये बचत गटाची भुमिका महत्त्वाची


                    

अरावती- शिक्षित व अल्पशिक्षित महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातुन आत्मानिर्भर बनवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये बचत गटाची भुमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांनी त्यांच्यात असलेल्या उद्यमशिलता व कल्पकतेच्या बळावर बचत  गटाच्या माध्यमातून अर्थाजन करण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या श्रीमती प्रीती देशमुख यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वयं सहायता समूहांना कर्ज वितरीत करण्यात आले. उमेद अभियान व बँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत या महा कर्ज वितरण मेळाव्यात 2 कोटी रुपये 113 समुहांना वितरीत करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी भातकुली पंचायत समितीच्या सभापती  कल्पना चक्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टेकाडे, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन  देशमुख, बँक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय प्रबंधक सुरेश खैरनार उपस्थित  होते. पुढे बोलतांना, महिलांनी स्वत मधील उद्योमशिलता व कल्पकता ओळखुन उद्योग क्षेत्रात प्राप्त होणाऱ्या विविध संधीचा स्वीकार करावा. बचत गटाच्या माध्यमातुन सुलभ पद्धतीने अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडून येत आहे. बचत गटामुळे महिलांमध्ये संघटनशक्ती व सामाजीक विकास होत असल्याची भावना श्रीमती देशमुख यांनी व्यक्त केली.


बचत गटामुळे महिला    आर्थिक दृष्टीने साक्षर

श्री. खैरनार  म्हणाले बचत गटामुळे महिलां आर्थिक दृष्टीने साक्षर होत आहेत. गटांना कर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत चा लेखाजोखा, खर्चाचा ताळमेळ याची नियमित नोंद घ्यावी. बचत गटाच्या प्रगती व उन्नतीसाठी आवश्यक त्या बाबी श्री खैरनार यांनी सांगितल्या.

 

गौरव उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा

बचत गटाच्या माध्यमातुन बँकीग क्षेत्रात, संस्था व क्षमता बांधणी व उपजिविका कार्य करणाऱ्या गोकुळा बघाने, संगीता विघे, अस्मिता जुनघरे, ज्योती इंगोले, सुलोचना पिंगळे, इंदू हिवराळे, प्रांजली मेश्राम, सोनल राणेकर, माधुरी डवरे, सुशमा कांबळे, रीना सतांगे, आरती मांजरे, कांचन जवंजाळ व मुक्ता ठाकरे या महिलांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. उमेद अभियानामुळे जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण समुह ते प्रभाग बांधणी पर्यतचा बचत गटातील महिलांचा झालेला विकास त्यांनी सांगीतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका अभियान व्यवस्थापक सुचिता पाटील यांनी केले तर आभार बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक माधव पोटे यांनी मानले. कार्यक्रमाला बचत गटाच्या महिला, उमेदची चमु आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments