डर के आगे जीत है! सर्जनशील व्यक्तिमत्त्व; श्री प्रसाद गाजरे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बुलढाणा

Prasad Gajare RTO buldhana copy


संतुष्ट होऊन कोणत्याही व्यक्तीला दिलेला विशिष्ट पदार्थ म्हणजे प्रसाद होय. 'प्रसादÓ या शब्दाने आकाशाची निरभ्रता, पाण्याची निर्मलता आणि मनाची प्रसन्नता दर्शविली जाते. म्हणजे प्रसन्नतेचे मूर्त प्रतीक होय.'प्रसादÓ म्हणजे भाग्यशाली,असे भाग्यशाली व्यक्तीमत्व स्व:कर्तृवाने यशाची भरारी घेऊन इतरांना  प्रेरणादायी ठरत असतात.असचं कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व आज आदरणीय प्रसाद नानासाहेब गाजरे बुलढाणा जिल्हात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) या पदावर कार्यरत आहेत.

मित्रांनो! असं परिवर्तनशील  व्यक्तिमत्व पाहुन तुम्हाला त्यां'या सारखं व्हावंसं वाटतं. आणि ही गोष्ट आपल्या करीता किती अभिमानाची होते जेव्हा हे कर्तुत्ववान व्यक्तिमत्व  महाराष्ट्रा'या मातीत संता'यापदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत रुजलेलं, वाढलेलं, शिकलेलं आणि कर्तबगारीनं सिध्द झालेलं असतं.असं व्यक्तिमत्व पुणे जिल्हातील शिरुर तालुक्यामधिल इनामगांव येथे दि. 28 फेब्रृवारी 1987 रोजी मातोश्री सत्यभामा नानासाहेब गाजरे या दांपत्यां'या कुटुंबात जन्मास आले.अत्यंत हुशार आणि प्रामाणिक असं व्यक्तिमत्व प्रसाद नानासाहेब गाजरे ,यशाची नौका पार करुन आज'या तरुणाई साठी प्रेरणादायी ठलरतेयं.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

हे काव्य डोळ्यासमोर ठेऊन लहानपणा पासुनच कुशाग्रबुद्धीमतेतून इनामगांवातच पहली ते दहावी पर्यत शिक्षणाचे धडे गिरवत,शाळे'या पहिल्या बाकावर बसून गुरुजीं'या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रर्यत्न करत धाडस दाखवत होते.चूकलो तरी चालेल पण विद्याथ्र्यां'या सर्वात अगोदर हात वरच दिसत होता. म्हणून नेतृत्वगुण, एकात्मता, बंधूभाव हे महत्वाचे घटक प्रसाद गाजरे साहेबां'या अंगी अंगीकृत झालेले होते.प्रसाद साहेब अकरावी,बारावीसाठी,शिरुर तालुक्या'या ठिकानी अॅडमिशन घेऊन चांगल्यापैकी मार्क संपादन करुन उत्तीर्ण झाले.त्यामुळे बारामती  येथे प्रवेश घेऊन इंजीनियरिंग मॅकनिकलचा कोर्स निवडला.जिद्द आणि मेहनती'या जोरावर मोठ होण्याचं स्वप्न उराशी बाळगुण प्रगतिसाठी शिक्षण हाच एक मोठा पर्याय आहे.त्यासाठी परिस्थितीला वाकविणारी जिद्द ध्यये गाठण्यासाठी यशापर्यंत पोहचवूशकते म्हणून सन: 2010 मध्ये एमपीएससी'या अभ्यास क्रमासाठी पुणे येथे सुरवात केली,मात्र एमपीएससी'या परिक्षेत अनुउतीर्ण होत यश संपादन करता आले नाही.पहिल्याच वेळी जीवनात भम्रनिराशा पोहचली.पण हार न मानता,न खचता,अपयश हे यशाची पहली पायरी असते म्हणून परत मोठ्या आत्मविश्वासाने साहेब पेटून उठले आणि जोमाने अहोरात्र अभ्यासात मग्न राहुन एमपीएससी व युपीएससी'या परिक्षेचा अभ्यास करु लागले.शिक्षणा'या जिद्दीतून यशाला गवसणी घालतायेत हे संस्कार मनावर प्रतिबिंबित केले होते.म्हणूनच आपल्या हातातून या देशाची सेवा घडावी या उपदेशानुसार शिक्षणाची आवड व मनात जिद्द असेल तर कितीही अपयशाचे संकटे आली तरी न डगमगता मनुष्य आपले ध्येय गाठतोच हेच सिध्द करुन दाखले आदरणीय प्रसाद नानासाहेब गाजरे साहेबांनी अभ्यासक्रम चेंज होऊन सुध्दा सन:201& मध्ये अखेर यशाची भरारी घेतलीच आणि कौतुकास्पद पात्र ठरलेतं.दोन वर्ष पुणे येथे ट्रेंनिग घेऊन पहिली पोस्ट अमरावती जिल्हात सहायक प्रादेशिक अधिकारी म्हणून निवड झाली.त्यानंतर अमरावती मधून कोल्हापुर येथे बदली झाली.कोल्हापूर जिल्हात आपल्या उत्तम कामगीरीने समाजात चांगली प्रतिमा निर्माण होऊन,शासनदरबारी चांगल्याकामाची नोंद झाल्याने प्रसाद गाजरे साहेबांचे प्रमोशन होऊन बुलढाणा जिल्हात ऑक्टोबंर 2021 पासुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) या पदावर कार्यरत झाले.आपल्या कर्तव्यात एकनिष्ठ राहुन उपप्रादेशिक परिवहन विभागाची कामगीरीमुळे जिल्हा'या नजरेत भरते.आज'या तरुणाई'या खांद्यावर राष्ट्र विकासाची जबाबदारी आहे.ही जबादारी त्यांनी लिलया पेलली पाहीजे तरच आपला देश विश्वात शोभून दिसेल म्हणून कत्र्तव्यनिष्ठ आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून जनमानसात ख्याती असलेले साहेब आज'या तरुणाईला संदेश देतात की,गेल्या दोन वर्षापासुन कोरोना विषाणु'या संकटात आपण मोबाइल विळख्यात गुरफटलेले दिसुन येत आहात. अभ्यासात मग्न दिसुन येत ना?

डर के आगे जीत है!

प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते.पण या भीतीमुळे येणारं दडपण,ताण कोणत्याही दृष्टीने हितकारक नसतो.म्हणूनच बिनधास्त आणि मोकळेपणाने जगायला शिकलं पाहीजे.सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन सुरवात करा,तूमची बीती आपोआप निघून जाईल.आपलं मनोबल जेवढं वाढत जाईल,तेवढी बीती कमी-कमी होत जाईल.कोणत्याही प्रसंगात जोपर्यंत तुम्ही स्वत:ची साथ सोडत नाही,तोपर्यत घाबरण्याचं कारणच नाही.'मी काय करु शकतोÓ, हे स्वत:चं ब्रीदवाक्य बनवल्यास कोणत्याही प्रसंगातून मार्ग काढता येईल. अशी सकारात्मक मनोवस्था असल्यास भीतीला जागाच उरत नाही.

स्वप्न तर सगळेच बघतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फ ार कमी लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलाखती देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. तर काही जणांना खस्ता खाव्या लागतात. पण जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय गाठताना तुम्ही कितीदा अडकलात? आणि तुम'या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही. पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्न नक्कीच साकार होतात.

 मेहनत घेतल्यावर यश पदरी पडते.प्रत्येक प्रयत्न हा पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करावा. तसेच मुलाखतीमध्ये अपयश येणे देखील महत्त्वाचे आहे. कारण अपयश हे व्यक्तीला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करते. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके चांगले दिर्घकालीन परिणाम तुम्हाला मिळतील, 

परिंदे रुक मत,तूझमे जान बाकी है

मंजिल दूर है,बहूत उडान बाकी है

असे तरुणाईला आदरणीय प्रसाद नानासाहेब गाजरे साहेब (आरटीओ) सातत्याने मार्गदर्शन करत असतात.आज एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्याचा विचार येतो तेव्हा इतर व्यक्तिमत्वासारखं साहेबांच सुध्दा नांव डोळ्यासमोर उभं राहतं.त्यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणा-यां विद्याथ्र्यां असो की कॉलेजमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत असलेल्या तरुणाईसाठी आदरणीय प्रसाद गाजरे साहेबांच मार्गदर्शन प्रेरणा देणारे ठलरतेयं.जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते.यश हे व्यक्तिगणिक बदलतं. परंतू प्रादेशिक,भाषिक, धार्मिक, आर्थीक, इ .अशा विभिन्नतेने नटलेल्या वा सजलेल्या आपल्या समाजात आपणही या समाजाचे काही देणे लागते या भावनेतून लोकसेवा करण्याची ओढ मनात रुजल्याने सांविधानिक वा कायदेशीर प्राधिकारां'या अधिन राहून,तरुणाईचे मनोबल वाढवण्यासाठी पुढे जाऊन प्रसाद गाजरे साहेब विद्याथ्र्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अभ्यासाची दिशा ठरवा,योग्य असे मार्गदर्शनात अभ्यास करा,दर्जेदार प्रेरणादेणारी पुस्तकाचे वाचन करा, स्टेटबोर्ड, एनसीआरटी, इंडिया एयरबुक, केंद्र सरकार व राÓयसरकारचा जाहीर होणारा अर्थसंकल्प सतत वाचन करा.तसेच मोबाइलचा वापर करत असताना गव्हरमेंट वेबसाईटचा वापर करा,आई वडीला'या मेहनतीचं चित्त करुन नांव रोशन करा. तसेच दैनिक वृत्तपत्र वाचन करत असताना अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,बातम्याला महत्व द्या.त्यातील स्तंभ लेखन वाचन व अर्थकरणावरील बातम्या वाचन करने,भुगोलाचा अभ्यासासोबत नकाशाची आवड निर्माण करा.मागील प्रश्नपत्रीका व्यवस्थीत पाहुन हाताळा, तेव्हा तूमचे सुध्दा जीवनमान नक्कीच उंचावेल व तूम्ही सुध्दा हिमालयाला गवसणी घालसाल हीच अपेक्षा तूम'या कडून समाजाला आहे.तुम्हालाही काही मोठं करायचं असेल, स्वप्नातील नोकरी मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. यानंतर त्याच ध्येयानुसार तयारीला लागावं लागेल. त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत घ्यावी लागेल. यश गाठण्यासाठी पहिल्यांदा रिजेक्टेड ई-मेल, अपयशी मुलाखती, कुटुंब, दबाव आणि निराशेपासून स्वत:ची मुक्तता करून घ्यावी लागेल आणि मोकळेपणाने अभ्यास आणि स्वत:वर विश्वास ठेवून काम करावे लागेल. कारण प्रयत्नाने यश नक्कीच प्राप्त होते. जे लोक प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर यशा'या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. कठोर परिश्रम आणि समर्पणा'या बळावर मोठी कामगिरी करता येते. 

त्या अनुषंगाने तुमचीही स्वप्ने कधीतरी पूर्ण होतील आणि तुम्हालाही यश नक्कीच मिळेल...!

पंछी सबसे Óयादा सुरक्षित एक पिंजड़े में होता हैज्लेकिन क्या वो इसलिए बना है? या फिर वो आकश की ऊँचाइयों को चूमने और आज़ाद घूमने के लिए दुनिया में आया है? फैसला आपका हैज्आप पिंजड़े का पंछी बनना चाहते हैं या खुले आकाश का?

खरोखर कत्र्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बुलढाणा यांचे कामगीरी उल्लेखनीय असून निश्चितच परिवर्तनशील, प्रेरणादायी असल्यामुळे अशा कृतिशील व्यक्तिमत्व असलेले आदरणीय प्रसाद नानासाहेब गाजरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बुलढाणा यां'या कार्यास त्रिवार सलाम!

संतोष अवसरमोल

(पत्रकार) मु.पो.घाटबोरी,

ता.मेहकर मो: 9689777129 

Post a Comment

0 Comments