विद्यापीठाच्या वूमन स्टडी सेंटरला स्व पद्मश्री सिंधुताई सपकाळ नाव द्या -डॉ. मनीष गवई

 


सिनेट सभेत डॉ. गवई  यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे स्वागत

अमरावती- (प्रतिनिधी)-महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने विद्यापीठात वूमन  स्टडी सेंटरची  स्थापना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठअमरावती येथे 2010 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अकराव्या योजनेअंतर्गत विभाग म्हणून करण्यात आलीबारावी योजनेअंतर्गतआंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून; 2014 या शैक्षणिक वर्षापासून जेंडर अँड वुमन स्टडीज नावाने सुरू करण्यात आले आहे.या महिला अभ्यास केंद्राची संकल्पना महिला भेदभावा ला दूर करण्यासाठी , त्याच्या परिणाम आणि उपचारात्मक कृती योजना समजून घेणे  महिला अभ्यासाचे क्षेत्र विकसित करणे असा असून विद्यापीठाच्या वूमन स्टडी सेंटरला स्व पद्मश्री सिंधुताई सपकाळ नाव द्या अशी मागणी भारत सरकारच्या क्रीडा  युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवादूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ.मनीष शंकरराव गवई यांनी नुकत्याच झालेल्या वार्षिक सिनेट सभेत केली असून या मागणीचे सभागृहात अभिनंदन करण्यात येऊन याबाबत व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झालीआपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिलायेथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जातेत्यांच्या भोजनकपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जातेशिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जातेआर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जातेअसे भरीव कार्य स्व पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी केले आहेविद्यापीठाचे वूमन  स्टडी सेंटरचे कार्य लिंगभेदाला आळा घालणे,गुदमरणार्या स्त्रीपुरुष सीमांतून माणसाचे ‘मनुष्यत्व’ वेगळे करून समाजात ‘लिंग समानता’ प्रस्थापित करण्यासाठी ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकणे.स्त्रियांचे जीवनत्यांचे अनुभवसंघर्ष आणि उल्लेख नसलेले अस्तित्व दाखवण्यासाठी,दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रातील लैंगिक भेदभाव समजून घेणे आणि त्यावर उपचारात्मक संशोधन करणे.,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महिला अभ्यासाच्या क्षेत्रात व्यापक संबंध आणि संवाद निर्माण करणे आहेहे कार्य स्व पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमाणे असल्याने त्यांचे नाव विद्यापीठाच्या वूमन  स्टडी सेंटरला देणे हि त्यांना खरी श्रद्धांजली असेल अशी मागणी डॉ गवई यांनी केली .महाराष्ट्र राज्य नव्या विद्यापीठ कायद्यानुसार संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्या सिनेटची सभेचे गठन करण्यात आले आहेविद्यापीठ  शैक्षणिक वर्तुळातील प्रश्न सोडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सिनेटसद्स्यावर असतेसिनेटची सभा विद्यापीठ  विद्यार्थी हिताला जोपासण्याचे काम करीत असतेया सभागृहात विविध सवर्गातून प्रतिनिधित्व दिल्या जात असतेराज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणुन डॉमनीष गवई यांची  निवड करण्यात आली असल्याने सिनेटच्या सभेत विद्यार्थी प्रश्नावर विद्यापीठाचे लक्ष्य केंद्रित करण्याची भूमिका त्यांची  असतेनुकतेच संपन्न झालेल्या  विद्यापीठाच्या  वार्षिक सिनेट सभेत डॉ मनीष गवई यांनी विद्यापीठाच्या वूमन  स्टडी सेंटरला स्व पद्मश्री सिंधुताई सपकाळ नाव द्या असा प्रस्ताव मांडला ज्यावर व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेडॉ  गवई हे विद्यार्थी प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आलेविशेष म्हणजे ही सिनेटची शेवटची सभा होतीआपल्या सिनेट सदस्य पदाच्या कार्यकाळात डॉ.मनीष गवई यांनी सर्वात जास्त प्रश्न  प्रस्ताव सभागृहात मांडले त्याबद्दल त्यांचा कुलगुरू डॉदिलीप मालखेडे यांनी विशेष अभिनंदन करून  सत्कार देखील केलातसेच डॉ मनीष गवई यांनी डॉदिलीप मालखेडे यांचा विशेष सन्मान सर्व सिनेट सदस्यांच्यावतीने याप्रसंगी केलाएकंदर विद्यापीठाच्या प्रत्येक सिनेट सभेत डॉ मनीष गवई हे सर्वात जास्त आक्रमक झाले असून त्यांनी विद्यार्थी हितांच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला आहेत.


Post a Comment

0 Comments