सिद्धेश्वर पवार.... सिर्फ नाम ही काफी है....

Sidheshwar Pawar Mehkar Birthday Vidarbhadoot Bildhana


अभिष्टचिंतन

 .. सिद्धेश्वर पवार खरं तर 'सिर्फ नाम ही काफी है असं ज्यांच्या बाबतीत हमखास म्हणता येईल असं हे नांव माहिती नाही असं कोणत्याच क्षेत्रात माणूस सापडणार नाही.पत्रकारितेत प्रखर बुद्धिमत्ता,अष्टपैलू माणूस, खमक्या, सर्वकाही 'साधनेत घडलेला.नि:पक्ष,निर्भीड,पत्रकारिता करत असताना समाजात काही विध्दंसक व्यक्तींना आपल्या लेखणीने आसुड ओढत घायाळ करणारा आणि दगडालाही देवपण देणारा शब्दप्रभू, माध्यमातला आश्वासक चेहरा,आपल्या वकृत्वाच्या अमृत वाणीतून, सुत्रसंचालन करत लाखो श्रोत्यांना गोड अमृत वाणीतून मंत्रमुग्ध करुन  त्याच्या हृदयात अढळस्थान निर्माण केलेला मेहकर तालुक्यातील एकमेव बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्या लेखणीतून अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी लेखणी अन्याय,अत्याचारावर प्रहार करत सत्य प्रकाशित करत आहे. पत्रकार हा कोणाच्या बाजूचा नसून तो विरोधात देखील नसतो,हा न्यायाच्या बाजूने असतो हे सिद्ध करुन दाखवणारे परिसासारख व्यक्तिमत्व,संपर्कात येणाऱ्या माणसांचं सोनं करतात.ते अष्टपैलू पत्रकार सिद्धेश्वर रा.ना.पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचं मन:पुर्वक अभिष्टचिंतन..!

हातात छिन्नी,हातोडा असला आणि त्याचा कौशल्याने वापर करता येत असेल,तर एक कुशल मूर्तीकार त्या दगडातून सुंदर मूर्ती निर्माण करतो.तसंच शब्दांचं सामथ्र्य,त्यांचं मुल्य आणि त्यांचा चपखल वापर करता येत असेल तर एक पत्रकार एखाद्या सामान्य माणसाला उच्च पदावर पोहचवू शकतो.असेचं अनेकांना देवपण देणारे आणि भष्टचाराची जाळे मुळे उखडूनं फेकणारे पत्रकारीतेतील एक ज्ञानाचं बहुआयामी,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व *Óसिर्फ नाम ही काफी है..*

सिद्धेश्वरदादाच्या लेखणीला न्यायाची धार ही तलवारीच्या धार पेक्षाही अधिक तेजस्वी दाही दिशा उजळून, शब्द वैभवाची ख्याती चंदणापरी सुगंध दरवळतो.

खरेतरं सिद्धेश्वर दादाच्या लेखनाचा मी अनेक वर्षापासून चाहता आहे.त्यांच्याकडे असलेली कुशाग्रबुद्धिमता,वकृत्व,ममत्वाचा ओलावा,पाहुन त्यांच्याशी मैत्रीचे संबंध जोपासत आमच्या दोन्ही परिवाराचे एक रक्ताचं नात नसले तरी त्या रक्ताच्या पलीकडे जाऊन एक गोडवा, ममत्व,आत्मियता, निर्माण झाल्याने,जिव्हाळ्याचं,वासल्यप्रेमाची वीण घट्ट विणल्या गेली आहे.त्यामुळे माझ्या कुटुंबातील मोठा भाऊ म्हणून वय आणि अनुभव या दोन्ही बाबतीत दादा सिनिअर असून माझ्यासाठी वंदणीयचं आहेत. नदीच्या प्रवाहासारखे सतत प्रवाहित असणारे स्वच्छ,निर्मळ आणि राग,लोभ,मोह,मत्सर यापासून अलिप्त असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपल्या परिश्रमाने,कृतिने मातीलाही सुंगध देणारे सर्वांना आपलेसे वाटणारे आणि पत्रकारितेचं कंगण हाताला बांधून अन्यायाचा प्रतिकार करत समाजाच्या सुखदु:खाशी समरस होऊन आपल्या अमृतवाणीतून मंत्रमुग्ध करणारी पत्रकारिता केली पाहीजे,कष्ट घेण्याची तयारी,प्रामाणीकपणा,प्रलोभनाला बळी न पडण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पत्रकार यशस्वी होतो अशी शिकवण त्याच्या तेजस्वी, ओजस्वी,अमृतवाणीतून माझ्या मनात घट्ट रुजलेली गेली आहे.त्यामुळे मलाही लिहण्यांचा छंद अवगत झाला आहे.दादाच्या सांनिध्यात आल्याने त्यांच्या पासून बरचं काही शिकण्यास मिळाले म्हणून माझ्याही जीवनात वेगळी कलाटणी मिळाली आहे.आज पत्रकारी क्षेत्रात सिद्धेश्वर पवार यांचे नाव घेताच अनेकांच्या भुवया उंचावतात.इतकी प्रचंड ताकद दादांच्या लेखणीत असल्याने भल्याभल्यांची भंबेरी उडते.लेखणी सोबत त्यांच्या वाणीतून निघणारा आवाज दाही दिशांनी घुमतो आणि झोपलेल्या माणसाला जागं करुन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बळ देतोय.त्या लेखणीत नि:पक्षपणा,वागण्यात नम्रता, दिसण्यात शांतता,लिहिण्यात परखडता, बोलण्यात लीनता, कधीच कुणाच्या आमिषाला बळी न पडणारा, धारदार लेखणीच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याची जाणीव करून दिल्या जातेयं. फुले- शिव-शाहू- आंबेडकर ,विचारधारा जोपासत,एकात्मतेचा संदेश देणारा, परिसासमान पुत्राचा जन्म आई श्रीमती दुर्गाबाई यांच्या उदरी दि.31 मार्च 1971 रोजी मेहकर तालुक्यातील सुलतानपुर येथे झाला.ज्या आईच्या दुधाने वाणी पवित्र झाली तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपल ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करुन दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील रा.ना.पवार यांच्या खांद्यावर बसून हे सार जग दिसलं ते वडील पेशाने शिक्षक, मुळं गावं ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहेत, सद्गुण हा शुक्राच्या तार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे,हे संस्कार सर्व भावंडांवर झाल्याचे दिसून येतात.या संस्काररुपी अखंड अमृताच्या झऱ्यातील वकृत्वाच अमृतप्राशन करुन आपल्या जीवनाची अमृतवेल सिद्धेश्वर दादानी फुलवली आणि त्याच वेलीला लागलेल्या फुलांच्या सुगंधाचा दरवळ आज साऱ्या राज्यात पसरलेला आहे.अशा या परिवारात वडील रा.ना.पवार यांना वकृत्वाचं जणूकाही वरदानचं लाभलेलं होते म्हणून ते संस्कार सिद्धेश्वर दादाच्या मनावर रुजलेले होते.सुलतानपुर,मेहकर, बुलढाणा अशा ठिकानी शिक्षणाचे धडे गिरवत दादानां पत्रकारिता बद्दल आकर्षीत झाले,छंद म्हणून हिवराआश्रम मध्ये पत्रकारिता सुरु केली अन् कायमस्वरुपीच पत्रकारिता अंगीकृत झाली.दैनिक दैशोन्नतीचे संपादक आदरणीय प्रकाशभाऊ पोहरे आवृत्ती संपादक राजेशजी राजोरे यांच्या आशीर्वादाने त्या पत्रकारीतेला यशाची झालर मिळाली.त्यामुळे  सदैव लेखणीच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत नि:पक्षपाती पणे अंगीकारल्याचे दिसतात. वारंवार समाजाचे प्रश्न उचलून धरताना, अन्यायावर मात करताना त्यांची धारदार लेखणी कुठेच कमी पडत नाही, "ना कधी कुणाच्या आमिषाला बळी पडले, ना कधी कुणाच्या दावणीला बांधले" सर्व सर्वसमावेशक अशी निर्भीड लेखणी करणारे समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांच्या हातून आजतागायत घडलेले आहे.मागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज मुक मोर्चानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठोक मोर्चा आंदोलन सुरु झाले.आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्त्यावर उतरला होता.त्यावेळी समाजात ऐकोपा टिकून ठेवण्यासाठी सिद्धेश्वर दादा आपल्या वकृत्वाच्या अमृत वाणीतून सुत्रसंचालन करत करत  लोखो जनसमुदायाची धूरा खांद्यावर घेऊन बुलढाणा,बऱ्हाणपूर, मुंबई मध्ये आपलं नेतृत्व सिद्ध करत,सुत्रसंचालणातून गोडवा निर्माण केला.त्यामुळे सिद्धेश्वरदादाचे आभार मानताना शब्दंच थिटे पडतात असे अनेकांनी बोलून दाखविले आहे.त्याच्या कार्याला जात,धर्म,पंथ,आडवे येऊ शकत नाहीत.मानवतेची पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरुद्ध, निर्भीडपणे,लेखणीतून शब्दांचा आसुड ओढण्याचे काम करत आहेत म्हणून सर्वजातीधर्माच्या लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जूळले असल्याने मेहकर शहरात आंबेडकरी अकादमीचे ते अध्यक्ष आहेत.तसं आंबेडकरी विचारधारा जोपासत असल्याने रिपब्लिकन सेनेचे संस्थापक यांनी समाजभूषण पुरस्कार देऊन दादाला गौरवण्यात आले आहे.दादाचे कार्यपाहून राज्यातील विविध संस्थानी सुध्दा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सिद्धेश्वर दादाची लेखणी राज्यात नांवलौकीक असल्याने राज्यातील अनेक आजी-माजी आमदार,खासदार,मंत्रीमहोदयासोबत मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे,नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही पुढे आहेत.दादाच्या वाणीत असलेला गोडवा हा सुत्रसंचलणातून माणसांच्या अंगाला स्पर्श करतो.त्यामुळे त्या गोडव्यातून ओलावा तयार होऊन प्रेमाची नाळ अधिकच घट्ट होते.असं अष्टपैलू,बहुआयामी, स्वभावाचं व्यक्तिमत्व समाजात रुबाबदार,दिसत असल्याने *सिद्धेश्वर पवार... सिर्फ नाम ही काफी है...*

पत्रकारिता तसा खूप जिकिरीचा विषय आहे. पत्रकार हा समाजाचा कणा आहे व तो कुणाच्या पायावर नाही तर जनतेच्या मुकुटावर शोभून दिसतो याची भावना सर्वत्र जोपासली जावी व समाजाने देखील पत्रकार हा आपला आधार समजून त्यांना सन्मानाची वागणूक देऊन पत्रकाराला सतत पाठबळ देऊन समाजाच्या जनकल्याणासाठी पत्रकाराची लेखणी तेवत ठेवण्यास आदर्श नाते जपले पाहीजे.असा अनमोल संदेश आपल्या गोड वाणीतून सुत्रसंचालनाच्या माध्यमातून जनतेसमोर प्रेरित करतात.

सिद्धेश्वर दादाची पत्रकारिता आणि वाणीतून निघणारा गोडवा हा कोहीनुरच्या हीऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान असल्याने आज त्यांच्या लेखणीतून कणखर लाखो-अरबो शब्द बाहेर पडतात.म्हणजेच दादाची लेखणी समुद्रापेक्षाही अफाट असल्याची जणूकाही भासते.त्यामुळे सिद्धेश्वरदादाच्या पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात विश्वास वाढत आहे.यातुनच समाजाला दीशा निर्देश मिळत आहे.दादाची पत्रकारिता ही वटवृक्षासारखी अफाट आहे कारण समाजातील घटना उन,पाऊस,थंडी,यासारख्या असल्यामुळे दादाची लेखणी संरक्षण देण्याच काम करत असून  लेखणीच्या ताकतीने अन्याय अत्याचारावर प्रहार करत आहे.

आपल्या प्रभावशाली बोलण्याने , ओजस्वी, तेजस्वी विचाराने आज सिद्धेश्वर पवार यांचे लिखान रोखठोक असून आकाशात झेप घेऊन इतिहास घडवत आहेत.त्यामुळे *सिद्धेश्वर पवार ... सिर्फ नाम ही काफी है...* म्हणून अशा कर्तुत्ववान,धाडसी,निर्भीड, सिद्धेश्वर पवार यांच्या लेखणीला त्रिवार सॅल्युट ...!

अशी उल्लेखनीय यशस्वी कारकीर्द असल्यामुळे लिहाव तेवढं कमीचं आहे.दादा या क्षणाला तूमच्या प्रामाणिक,  कर्तव्यनिष्ठा...

...हिऱ्याप्रमाणे चमकत राहो

आपल्या कर्तुत्वाची ख्याती

स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत

व्हावी मनामनाची नाती.

या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....!


संतोष अवसरमोल ( पत्रकार)

मु.पो.घाटबोरी/ ता.मेहकर

मो:9689777129

Post a Comment

0 Comments