मायमाऊल्यांनीही सुधारायलाच हवे!



संजय निकस पाटील

आज ८ मार्च. म्हणजे जागतिक महिला दिन. खास महिलांचाच दिन. त्यासाठी सर्व प्रथम सर्व माय माऊल्यांना महिला दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा! आज फक्त आणि फक्त महिलांचाच दिन असल्यामुळे आजचा दिवस तरी कुण्याही माय-माऊलीच्या आयुष्यातील दीन होऊ नये, हीच माफक अपेक्षा. ताहीतर दरदिवशी वर्तमानपत्र उघडले तर एकातरी पानावर महिलांचा दिन, दिन केल्याची बातमी हमखास दिसते. अन्याय अत्याचाराची बातमी नक्कीच दिसते. त्यामुळेच निदान उद्याच्या वर्तमानपत्रात तरी अशी कोणतीही बातमी दिसायला नकोच. तेव्हा कुठे ख:या अर्थाने आपण महिला दिन साजरा करतोय, करीत आहोत, असे म्हणता येईल. 

लेख वाचणा:या वाचकांनाही प्रश्र पडला असेल, की संजय निकस आणि महिला या गोष्टींचा लिखाणाच्या बाबतीत दूर-दूर पर्र्यंत कोठेही संबंध नाही. मग अचानक महिला दिनावर कसे काय लिखाण? तर त्याचे उत्तर सुरुवातीलाच देऊन टाकतो, म्हणजे नंतर प्रश्रच उरनार नाही. तसं पाहलं तर माझी लिखाणाची भाषा ही काल्पनीक किंवा बेगडी, हाजी-हाजी करणारी कधीच राहली नाही. जे काय मत मांडायचे ते अगदी स्पष्ट. मग विषय कोणताही असो. ब:याच वर्षांपूर्वी एकदा असेच महिला दिनाला मि सर्वप्रथम आर्टीकल लिहले. ते  ८ मार्चलाच एका प्रादेशिक वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले. त्यावर अनेकांनी आक्षेपही घेतला, की महिलांच्या समानतेच्या हक्कांबाबत तुम्ही वाईट विचार मांडत आहात. वास्तविक त्या आर्टीकलमध्ये कुठेही काहीही वाईट, अपशब्ध नव्हता. केवळ कुण्याच्यातरी बुडाला आग लागली आणि केला फोन वर्तमानपत्राच्या संपादकाला. संपादकांनीही मला घरी माणूस पाठवून बोलवून घेतले. अर्थातच त्या वेळी मोबाईल फोनचा नुकताच जन्म झाला होता. त्यामुुळे माझ्याकडे असण्याचा प्रश्रच नव्हता. असो, त्यानंतर पुढील दोन-तिन दिवस त्या विषयावर अनेक महाभागांनी तोंडसुख घेतले. पण त्यातून एक बोध घेतला ही, की नको महिलांवर लिहणे. पण आज ब:याच वर्षांनी खास महिला दिनालाच महिलांवर लिखाण करीत आहे. त्याला कारणही तसेच आहे. काल ७ मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अकोल्यातील कौलखेड परिसरात आदिशक्ती मंडळाच्यावतीने, माजी राज्यमंत्री गुलाबराव गांवडे यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शिवा मोहोड, युवराज गावंडे, सागर मोहोड यांच्या परिश्रमातून, मेहनतीतून हभप. निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच आपले ईंदुरीकर महाराज यांचे राज्यातील पहिले महिला दिनाच्या पुर्वसंध्येला  जबरदस्त किर्तन संपन्न झाले. जवळपास आंशी हजाराच्या आसपास महिला व पुरुषांनी या किर्तनाला गर्दी केली होती. रस्ते तुडुंब भरले होते. आणि त्यातूनच मग महिलांविषयी काहीतरी लिहावेच असे सहजच डोक्यात आले. त्यातच, वेळच वेळं आहे आता माझ्याकडे. कारण डॉक्टरांनी सहा महिन्यांचा सक्तीचा बेडरेस्ट सांगितला आहे.  आणि त्यामुळेच महिलाविषयी केलेला लेखप्रपंच.

आज महिला दिन म्हणजेच नामांकीत महिला विविध ठिकाणचे स्टेज काबीज करुन अगदी पोटतिडकीने, बेंबीच्या देठापासून महिला सक्षमिकरण, महिलांचा विकास यावर भाषणे ठोकणार आहेत. हे स्वातंत्र्यापासून आजतागायत सुुरु आहे. मग प्रश्र असा पडतो, की या भाषणांमुळे किती महिला सक्षम झाल्यात? किती महिला आज चुल आणि मुल या परिघातून बाहेर आल्यात? बालविवाहाचे प्रमाण किती कमी झाले? महिला अत्याचाराची संख्या कमी झाली आहे का? याचे खोलात जाऊन संशोधन करणे आज काळाची गरज आहे. याचे उत्तर जर म्हणला, तर महिलांच्या जीवनात कोणत्याही प्रकारे परिवर्तन झालेले नाही. आजही कमी अधिक प्रमाणात पूर्वपार चालत आलेली परिस्थीतीच महिलांच्या आयुष्यात आहे. त्यामुळे बदल कोणताही झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे या प्रश्रांवर चिंतन होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ भाषणांमधून किंवा प्रबोधनातूनच परिवर्तन होत असते, असे अजिबात नाही. तर मुळात सुुरुवात ही आपल्या पासूनच करावी लागती. समोरच्याकडून अपेक्षा ठेवावी लागत नाही. तेव्हा कुठे परिवर्तनाला सुुरुवात होत असते. त्यामुळे भाषणे नक्कीच ठोका; परंतु परिवर्तनाची सुुरुवात ही स्वता:पासूचन करा. तरच आपल्या प्रत्येक भाषणाला आणि कृतीला अर्थ प्राप्त होईल. असो, विषय खूप मोठा आहे, तरही आपण काही मुद्यांच्या आधारे यावर चर्चा करुयात, ती पुढील प्रमाणे....

महाराष्टातील महिलांचा विकास

महिला विकासासाठी देशात अनेक महापुरुषांनी चांगले कार्य केल्याचे आपण नेहमीच वाचतो, परंतु आपल्या महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे महापुरुष याच महाराष्ट्र भूमित जन्माला आले, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. परंतु आज भोवतालची परिस्थिती पाहिली तर या महापुरुषांचे विचार आपण विसरत चाललो आहोत, असेच दिसून येते. स्त्रियांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी संघर्ष करणा:या समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआर्ई फुले यांचे कार्य अफाट व महान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अग्रगण्य आहे. बाबासाहेबांनी संविधानातील तरतुदींमधून अनेक अधिकार महिलांना बहाल केले आहेत. यांच्याशिवाय महर्षि धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांचे  कार्यही महत्त्वपूर्ण असे आहे. मग प्रश्र पडतो एवढे आभाळभर उंचीचे महापुरुष या महाराष्ट्रभूमिमध्ये महिलांसाठी कार्य करीत होते, आजही त्यांचे विचार प्रेरक असे आहेत, तरीसुद्धा महाराष्ट्रातील स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या साखहीत खंड का पडत नाही. यावर आजच्या दिनी केवळ चर्चा, भाषणे न करता कृती होणे अपेक्षित आहे.तर ख:या अर्थाने महिला दिन दीन ठरणार नाही.

महिलांवरील अत्याचार

कोणत्याही दिवशी, कोणतेही वृत्तपत्र उघडा, कुठे ना कुठे महिला अत्याचाराची बातमी तुम्हाला हमखास दिसेल. मग प्रश्र पडतो की समाजाची मानसिकता कोणत्या स्तराला जात आहे? आपण कोणत्या काळात वावरत आहोत? ज्या महिलेवर अत्याचार होतो, त्या महिलेत अत्याचार करणाराला आपली आई-बहीण का दिसत नाही? समाजात पसरत असलेली ही विकृती थांबायला प्रशसनाचा धाक आहे, कायद्याचा आधार आहे, तरीही हे चित्र का बदलत नाही. यावरही कृती होणे आजच्या दिवशी अपेक्षित आहे.

असंघटीत महिला कामगार

स्वत:च्या मेहनतीवर घर चालविणा:या महिला कामगार त्यामध्यू घरगुती काम करणा-या, कंपनी कामगार, मातीकाम व शेतमजूर या असंघटित  महिलांच्या कार्यक्षेत्राला कोणतेही वलय नसते. कामावर असताना या महिलांकडे वाईट नजरेने पाहिले जाते. पुरुष कामगार, मुकादम, कंत्राटदार, तर कधी खुद्द मालकाकडून त्यांना लैंगिक छळ सहन करावा लागतो. कुटुंब किंवा यंत्रणेकडून सुरक्षा मिळत नसल्याने असंघटित क्षेत्रात काम करणा-या महिलांना लैंगिक छळाला बळी पडावे लागत आहे. असंघटित क्षेत्रात काम करणा-या काही महिलांना याबाबत काही प्रश्न विचारले तर धक्कादायक काही गोष्टी समोर आल्या. असंघटित क्षेत्रातील एक दोन महिलांचाच हा प्रश्न नसून या प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. एका मॉलमध्ये काम करणा-या महिलेला जो अनुभव आला तिने ते कथन केले आहे. स्वत: वर बितलेली आपबिती तिने सांगितली आहे. एक महिला एका मोठय़ा मॉलजवळ एका बंगल्यात आधी काम करत होती. घरात फक्त वृद्ध जोडपे होते. त्यातील आजीला अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे त्या काहीच काम करू शकत नव्हत्या. तिथे दिवसभर राहून तिला घरातील सगळी कामे करावी लागत होती. नंतर त्या घरातील वृद्ध व्यक्ती तिला मोबाइलवर महिलांचे फोटो दाखवायचा. सुरुवातीला तिने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. काम झाले की, आजीच्या रूममध्ये जाऊन ती बसायची. तरी हे प्रकार काही बंद झाले नाहीत. ते येता-जाता कामाच्या निमित्ताने तिच्याजवळ यायचे. त्या महिलेच्या घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्याने तिला काम सोडता येत नव्हते. काही दिवसांनी तिला दुसरे काम मिळाले, त्यामुळे तिने हे काम सोडले. कुणाकडे तक्रार केली, तर खरे वाटणार नाही म्हणून तिने कुणालाच याविषयी काहीच संगितले नाही. या लहान सहान घटनाही मोठ्या अत्याचाराला कारण ठरत असतात, यावर विचारपूर्वक कृती व्हायलाच हवी.  असेच काहीसा प्रकार कापड दुकानात काम करणा-या एका तीस वर्षीय विवाहित तरुणींने आपले मनोगत सांगताना आलेला वाईट अनुभव कथन केला. कापड दुकान मालक तिला दुकानात सकाळीच बोलवायचा, नको तिथे स्पर्श करणे, सतत टक लावून बघणे, रात्री उशिरापर्यत दुकानात कोणत्याही कारणाने थांबवून ठेवणे अशा हरकती करत असल्याचे तिने आपली आपबीती कथन केली. अन्याय झाला अशी तक्रार करणा-या महिलांना खरंच न्याय मिळत असतो का.? असे या महिलांना विचारले असता न्याय तर दूरची गोष्ट. तक्रार करणा-यांची दखलच घेतली जात नसल्याची खंत या महिलांनी व्यक्त केली. न घाबरता सांगणा-या स्त्रीला मदत तर मिळत नाही, उलट तिच्याच चारित्र्यावर संशय घेऊन तिची बदनामी होते. विशेष म्हणजे अशावेळी घरातूनही सहकार्य मिळत नसल्याने लढा द्यायचा तो कसा, अशी खंत महिलांनी बोलून दाखवली आहे.


महिला आणि शासन प्रशासनाची धोरणं

महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी खास धोरणे आखली आहेत.  विविध महिला विकास योजना राबविण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ - महाराष्ट्रात यादृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ ही महिला विकासाच्या सर्व योजना राबविण्यासाठी शिखर संस्था म्हणून घोषित करण्यात आली. या महामंडळाची स्थापना 24 फेब्रुवारी 1975 रोजी करण्यात आली असून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये असणा-या क्षमता वाढविणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील उद्योजकता विकसित करणे, त्यांच्यासाठी रोजगार संधी उपलब्ध करणे, महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने महामंडळ कार्यरत आहे. महामंडळातर्फे महिलांसाठी जाणीव व जागृती कार्यक्रम, स्वंयसिद्धा प्रकल्प, स्वर्णजयंती ग्राम रोजगार योजना, स्वयं-सहायता बचत गटाचे महासंघ, कृषी सप्तक योजना, तेजस्विनी महाराट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम तसेच सरकारला महिला विकास योजनांसंदर्भात सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य महामंडळाकडून केले जाते. या सर्व गोष्टीची व्यापक प्रमणात माहिती सर्व महिलांना होणे गरजेचे आहे.

Shivpratishthan Woman in maharashtra 1 copy


अन्याय अत्याचाराला महिलाच कारणीभूत आहेत का?

हा शेवटचा मुद्या थोडा धक्कादायक आहे. तरही यावर प्रकाश टाकणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांवर जे शारिरीक अत्याचार होतात. त्याला महिलाच जबाबदार आहेत का? तर याचे उत्तर आपल्याला आपल्याच चौफेर, नजरेतील संशोधनातूनच आपोआप मिळेल. कालचे इंदुरिकर महाराजांचे पूर्वीसारखे किर्तन अजीबात वाटले नाही. कारण पूर्वी महाराच्या किर्तनाचा गाभा पुरुष आणि महिलाच असायच्या. त्यांचा निटनेटका संसार व्हावा हीच महाराजांची अपेक्षा असायची. परंतु महिला दिनाच्या किर्तन कार्यक्रमात महाराजांनी महिलांच्या अनेक गोष्टींना, पश्रांना बगल दिली. कारण याच महिला महाराजांनाही त्रासदायक ठरल्या आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. ज्यांना सूपर्ण मराठी देशाने डोक्यावर घेतले, विदेशातील मराठी बांधवांनी प्रेम दिले, त्यांच्या प्रबोधनातून जगण्याचे बळ मिळवीले अशा महान इंदुरीकरांनाही महिलांच्या विकासावर भाष्य करण्याचा त्रास होतो, ही शोकांतिका आहे. म्हणतात ना एक आंबा संपूर्ण आढीला सडवितो, असा प्रकार व्हायला लागला आहे.

मा. राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे विचार

महिला दिनाच्या किर्तन कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या पूर्वी अकोल्यातील माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी या किर्तन व्यासपिठावर समयोचित विचार मांडले. त्यांनी यावेळी खास महिलांच्या पेहरावाबाबत भाष्य केले. त्यांच्या बोलण्याला आजघडील संपूर्ण पुरुषवर्गाने आणि महिलांनीही पाठिंबा देऊन आंमलात आणणे गरेजेचे आहे. तीच काळाची गरज आहे. ना. गावंडे यांनी येथे बोलताना सांगितले की आपल्या मुस्लीम समाजातील भगिनी अंगभर वस्त्र वापरतात, आणि हेच महिलांना शोभून दिसते, मग हिंदु धर्मातील महिलांना अंगभर कपड्याचा कंटाळा का येतो, यावर गंभिर चिंतन होऊन कृती होणे आवश्यक आहे. महिला हा विषय खूप मोठा आहे, व्यापक आहे. त्यामुळे या विषयावर संपूर्ण समाजव्यवस्थेनेे चिंतन करुन कृती करणे आवश्यक आहे. तरच आजचा महिला दिन हा महिला दिनच राहील, तो दीन ठरणार नाही, त्यामुळे मायमाऊल्यांनीही सुधारायला हवे, तिच काळाची गरज आहे.

संजय निकस पाटील, संपर्क- ९४०५६६५५९९, लेखक हे सा. विदर्भदूत व साप्ताहिक शिवप्रतिष्ठानचे मुख्य संपादक आहेत.

Post a Comment

0 Comments