अमरावती, शासनाच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलापथक कार्यक्रमाचा शुभारंभ आज अमरावती तहसील कार्यालयात झाला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कलापथकांचा हा जागर आजपासून सुरू झाला. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये 17 मार्चपर्यंत कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभ प्रसंगी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गत दोन वर्षांत महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्याची अंमलबजावणी, विविध योजना- उपक्रम, शासनातर्फे कोरोनाकाळात राबविण्यात आलेले उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, महिला व बालविकास योजनांसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव, आरोग्य सेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचविण्यात येत आहे.
0 Comments