मुस्लिम मतांसाठी मविआ सरकारलाच अमरावती जिल्ह्यात दंगल घडवायची आहे -निवेदिता चौधरी यांचा आरोप

 



अमरावती- अचलपूर येथे मुस्लिम युवकांनी झेंडा हटवून गोटमर केली असताना केवळ हिंदू तरुणांना पोलिसांनी कोठडीत ठेवले आहे.आगामी महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकीत मुस्लिमांची गठ्ठा मते मिळावी यासाठी अमरावती जिल्ह्यात मविआ सरकार दंगल घडावी यासाठी खतपाणी घालत आहे असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी आज अचलपूर येथे केला आहे.दंगलग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी गेलो असता आपल्यासकट भाजपा कार्यकर्त्यांना आसेगाव पोलिसांनी अटक केली असून पोलीस भाजपा कार्यकर्त्यांची धरपकड करून दबाव आणत आहे.अमरावती शहरात सरकारला हिंदू मुस्लिम दंगल घडवायची होती परंतु हिंदूंनी समजदारी दाखविल्याने परिस्थिती शांत राहिली परंतु सरकार काही घटकांना चिथावणी देऊन दंगल घडवून हिंदूंना घाबरीविण्याचे काम करीत आहे .असा आरोप सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केला आहे.हिंदूंवर पोलिसांचे अत्याचार असेच सुरू राहिल्यास हिंदू समाज मुकदर्शक बनून राहणार नाही

Post a Comment

0 Comments