अमरावती- जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला भारताला सुपर पावर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आकांक्षा ठाकूर यांनी केले आहे. भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये आम्हाला शांतता आणि प्रगती हवी आहे आम्हाला भारताला सुपरपॉवर झालेले आणि भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
0 Comments