आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी IAS वैभव वाघमारे यांचा राजीनामा (महाराष्ट्र राज्यात पहिली घटना)
राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पाठविला राजीनामा
चिखलदरा तालुका प्रतिनिधी - नितीन वरखडे
अमरावती जिल्ह्यातील मेलघाट क्षेत्रासाठी धारणी सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर उत्कृष्ट काम करून जनतेला न्याय देणारे
श्री वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या मुळे,
हजारो आदिवासी नागरिकांच्या चेहऱ्यावर निराशा हा बघावयास मिळत आहे वैभव वाघमारे यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात जनसामान्य नागरिकांचे चेहऱ्यावर कमालीची निराशा दिसत असून राजीनाम्यामुळे निराशेचे वातावरण संपूर्ण मेळघाट मध्ये पसरलेले आहे.
वैभव वाघमारे हे धारणी येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाले होते.
त्यानंतर त्यांच्या कडे विभागीय दंडाधिकारी कार्यालयातही सुद्धा भार होता कमी दिवसात सर्वात मोठे कार्य क्षेत्र असलेले मेळघाटया भागांमध्ये प्रत्येक गावात जाऊन आदिवासी नागरिकांना त्यांचे हक्क व न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केला असल्याने नागरिकांच्या मनात त्यांच्या कार्यशैली विषयवेगळे स्थान निर्माण झाले होते.
अचानक पणे त्यांच्या राजीनाम्याची बातमी समजतातह जारो नागरिकांच्या मनात शंका निर्माण झालेले आहेत,
महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही राजीनाम्याची घटना असूनश्री वैभव वाघमारे कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी राजीनामा का दिला प्रश्न व अशा चर्चाही सुद्धा नागरिकां मध्ये ऐकू येत आहे.
0 Comments