महामानवांच्या विचारानुसार कार्य करण्याची आपली जबाबदारी आहे - प्रा.डॉ.अलका गायकवाड
अमरावती प्रतिनिधी : महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांची मुले शिकली पाहिजे म्हणून अहोरात्र कार्य केले. कारण बहुजनांचे दारिद्र्य,शोषण, कर्जबाजारीपणा, देवभोळेपणा यांचे मुख्य कारण हे त्यांचे अज्ञान आहे हे त्यांनी जाणले होते.त्यामुळे बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या, अस्पृश्य मुलींसाठी शाळा काढल्या,ज्यांच्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकतो .त्या महामानवांच्या विचारानुसार कार्य करण्याची आपली जबाबदारी आहे.याचे भान मात्र आपण ठेवले पाहिजे, महामानवांनी पेटवलेली विचारांची व कार्याची ज्योत पेटती ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून आपण कार्यप्रवण झाले पाहिजे ,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते प्रा.डॉ.अलका गायकवाड यांनी असे मत व्यक्त केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आराधना वैद्य, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.अलका गायकवाड, मराठी विभाग प्रमुख,भारतीय अमरावती प्रमुख उपस्थिती डॉ.संगीता कुळकर्णी, डॉ. मीता कांबळे, डॉ.प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना डॉ.स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी,राष्ट्रीय सेवा योजना विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रशांत विघे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आराधना वैद्य म्हणाल्या की, आपल्याला महाराष्ट्राच्या वैभव आहे, की येथे थोर असे समाजसुधारक लाभलेले आहे.ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशकार्यासाठी घालवले,त्यामुळे माणसाने आपल्या शरिरावर आपलेच डोक असायला पाहीजे आपण जीवण जगत असतांना प्रत्येकानी स्वतःच्या विचारानी चालायला पाहिजे, दुसऱ्याच्या विचाराच्या गुलामगिरीत राहूण जीवन जगणे योग्य नाही, अश्या महान समाजसुधारकांचे विचार तरुण पिढीने आपल्या आचरणात आणावे.त्याची आजच्या आधुनिक युगात खूप महत्त्वाचे गरज आहे असे प्रतिपादन केले.
पुढें वक्ते प्रा.डॉ.अलका गायकवाड म्हणाल्या की, म. फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकाचे विचार हे म्हातारपणी वाचण्याची गोष्ट नसून तारुण्यातच वाचले पाहिजे,तो विचार प्रत्यक्षात कृतीत आणला पाहिजे, प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे असे म्हणाला.शेवटी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या काव्यपंक्ती
" विद्येविना मती गेली ।
मती विना निती गेली |
निती विना गती गेली ।
गती विना वित्त गेले। वित्त विना शुद्र खचले ऐवढे अनर्थ एका अविद्येने केले .
त्या म्हणाल्या की, एक वेळ सूर्य मावळतो,पण विचारांचा सुर्य कधीच मावळत नाही असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षक-शिक्षकेतर,कर्मचारी विद्यार्थी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आकांक्षा बुटले, आभार डॉ. स्नेहा जोशी यांनी व्यक्त केले.
क वेळ सूर्य मावळतो,पण विचारांचा सुर्य कधीच मावळत नाही - प्रा.डॉ.अलका गायकवाड
0 Comments