मलकापूर शहरात पत्रकारांच्या हक्काचे पत्रकार भवणासाठी जागा द्या - हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

 


मलकापूर / मनोज जाधव - येथे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आज हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनाव्दारे  करण्यात आली .

      बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हे मोठी बाजारपेठ व रेल्वे स्थानक असलेले शहर आहे येथे जिल्ह्यातील भरपूर नागरिकांचे आवक -जावक रोज सुरू असते त्यात अनेक क्राईम ही घडत असतात. यात मोलाचा वाटा म्हणजे एक पोलीस तर दुसरा पत्रकार असे असते. व तोच पत्रकार आज कुठल्याही घटनेची बातमी बनवायची असली तर त्याला याच्या त्याच्या प्रतिष्ठानात जाऊन बसावे लागते. काही राजकीय पक्ष आपल्या पत्रकार परिषद नेहमी घेत असतात त्यासाठी पण कुठेतरी ते बोलावतील त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जाते. हीच सर्व काम करण्याकरिता पत्रकाराला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनाव्दारे  करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद यांच्या मालकीची मलकापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भागात नगर परिषदेची शाळा क्रमांक 1 ही रिकामी पडली असून ती जागा पत्रकार भवणासाठी आपण द्यावी. यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, अजय टप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, उल्हासभाई शेगोकार तालुका अध्यक्ष, कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, संदीप सावजी, विनायक तळेकर, बलराम बावस्कर, दीपक इटनारे, नथूजी हिवराले, नागेश सुरंगे, करणसिंग सिरसवाल, प्रा प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, प्रमोद हिवराळे, धरमेशसिंह राजपूत, अनिल झनके, सय्यद ताहेर, योगेश सोनवणे, हे सर्व उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments