अकोला : मुलीचे कन्यादान हा वडिलांच्या आयुष्यातील कठीण असा प्रसंग असतो,परंतु ज्या घरात ़गरीबी आहे, मुलांना पोटभर जेवण मिळत नाही पैशाअभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही,असा गरीब मुलगा व मुलगी ज्यांचे शिक्षण जेमतेम अक्षर ओळखपुरते झालेले, परिस्थितीमूळे दोघांचेही कुटूंब लग्नाचा खर्च करू शकत नाही. ही माहीती रमेश आसोलकर औरंगाबाद यांची मुलगी रेखा व हरिहर पेठ, अकोला येथील होतकरू व गरीब मुलगा मोहन अंबादास कण्हेरकर यांची व्यथा राजेश गावंडे यांनी श्री शंकरराव लंगोटे करून दिली. नेहमी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे लंगोटे यांनी दि.१९/६/२०२२ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, खडकी येथे दोन्ही उभयतांचे लग्न लावून दिले व भोजनाचा संपुर्ण खर्च त्यांनी केला. सामाजिक, धार्मिक कार्यात निस्वार्थपणे दानधर्म करणारे खरे समाजसेवक शंकरराव लंगोटे होय! पैसा भरपूर लोकांकडे आहे परंतु तो सत्कारणी कसा लागेल व कोणाचे आपल्या दाणातून भले कसे हेोईल असे शंकरराव होय. सामूहिक सोहळ्यात देखिल त्यांचा सक्रिय सहभाग असतोच!
या विवाह कार्यक्रमात हरिभाऊ वाघोडे, माजी जी प अध्यक्षा सौ संध्याताई वाघोडे, माजी जि.प. सदस्य शंकरराव लंगोटे, विनायकराव कारंजकर, गिरजाप्पा खताळे, सुरेंद्र हुंडीवाले, रवींद्र हुंडीवाले, मनोहर यमगवळी, महेंद्र लंगोटे, नागप्पा यमागवली, प्रकाश कदम, निवृत्ती रुद्राकर, पत्रकार पंजाबराव वर, मनोहर मानकर, गजानन वाघमारे, विश्वनाथ आव्हाळे व खडकी येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नवदाम्पत्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. शंकरराव लंगोटे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे पंजाबराव वर यांनी कळविले आहे.
0 Comments