यशोमती ठाकूर म्हणजे चोर मचाये छोर भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचा पलटवार सत्तेवरून पायउतार झाल्याने यशोमती ठाकूर निरशाग्रस्त



अमरावती-  दहशतवाद्यांशी भाजपाचे सबंध ओढून ताडून भाजपला बदनाम करण्याचा  प्रयत्न काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर करीत असून यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाचेच सबंध दहशतवाद्यांशी खोलवर रुतले असल्याने यशोमती ठाकूर नावाचे रसायन म्हणजे चोर मचाये छोर असे आहे असा पलटवार भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी आज यशोमती ठाकूर यांच्या पत्रकारपरिषदे नंतर केला आहे.मुळात जिल्हा बँकेच्या सभागृहात राजकीय विषयावर पत्रकार परिषेद घेण्यावरच आपला आक्षेप असून यासिन मलिक या दहशतवाद्याला मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना पंतप्रधान निवसासापासून कार्यलयात मुक्त प्रवेश होता,कश्मीरी पंडितांची हत्या  काँग्रेसच्या आशीर्वादानेच करण्यात आल्या,काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत सामंजस्य करार करणे,राजीव गांधी फाउंडेशन साठी  चीनकडून देणगी स्वीकारणे,बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांसाठी सोनिया गांधी यांना रडू कोसळणे ,ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसमाजी करणे,झाकीर नाईक पासून पक्ष निधी स्वीकारणे, असे अनेक संबंध काँग्रेसचे दहशतवादयासोबत असून काँग्रेस व त्यांची पिलावळ भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.यशोमती ठाकूर स्वतः त्यांच्या तिवसा मतदारसंघात गुन्हेगारांना रेती,दारू माफियांना,खंडणीखोरांना, सोबत ठेवतात अमरावती शहरातील उमेश कोल्हे यांच्या हत्येला लुटपाटीमुळे हत्या झाली या अँगलने तपास करावा असा दबाव  यशोमती ठाकूर यांनीच पालकमंत्री असतांना पोलिसांवर टाकला असे असतांना आता कोणत्या तोंडाने ठाकूर दहशतवाद, भ्रष्ट्राचार इत्यादी विषयांवर बोलतात असा सडेतोड सवाल निवेदिता चौधरी यांनी विचारला आहे.काँग्रेस व खास करून यशोमती ठाकूर यांना कोणताही नैतिक अधिकार भाजपाच्या राष्ट्रभक्तीवर आक्षेप घेण्याचा नाही. सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याने यशोमती ठाकूर प्रचंड निराश असून सैरभैर झाल्या आहे पक्ष श्रेष्ठीला खुश करण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी यशोमती ठाकूर असे विषय स्वतःच पक्षाला मध्ये मध्ये मागून घेऊन आपली फजिती करतात अशी टीका सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments