विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आधुनिक तंत्रज्ञानाचावापर करावा : आमदार सिद्धार्थ खरात

  


जेईई व निट चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले टॅब 

इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर अंतर्गत मेहकर व लोणार तालुक्यातील 99 पात्र लाभार्थी  विद्यार्थ्यांना मेहकर लोणार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शुभहस्ते  टॅब वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदेश लोढे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था मेहकर हे होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, मेहकर शहर अध्यक्ष युवा उद्योजक किशोर गारोळे, उप प्राचार्य श्री शिवाजी हायस्कूल मेहकर  तेजराव गायकवाड,भाकडे सर, काँग्रेस पार्टीचे मेहकर पक्षनेते ॲड अनंतराव वानखेडे, रा.कॉ.चे तालुका प्रमुख दत्ताभाऊ घनवट, आमदार पुत्र डॉ सार्थ खरात, युवा सेनेचे प्रमुख ॲड आकाश घोडे,ॲड संदिप गवई,उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवराच्या स्वागतानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये मुख्याध्यापक देवेंद्र पदमने यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर (महाज्योती ) राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगात उद्योग, व्यवसाय, विविध स्पर्धा परीक्षा  JEE, NEET, MPSC, UPSE याचा अभ्यास करताना शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये टॅब चे कसे महत्व आहे हे पटवून दिले, तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांचे चिरंजीव डॉक्टर सार्थ खरात यांनी कोरोनाच्या काळामध्ये टॅब चा वापर करून कशाप्रकारे यश संपादन केले हेही सविस्तर सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण बुलढाणा यांच्यावतीने  मुख्याध्यापक गोपाल होणे, मुख्याध्यापक परिहार,उदय मोहळे , प्रवीण डव्हळे, सागर पवार, अक्षय जाधव हे उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संदीप राठोड व आभार प्रदर्शन  गणेश खनसरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments