बुलडाणा, दि. 22: महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांचे कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणामार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीमार्फत सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या वर्षाकरीता पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली आहे. ते याप्रमाणे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22 : गुणवंत पुरुष खेळाडू - उज्वल भरत ओळेकर (धर्नुविद्या), गुणवंत दिव्यांग खेळाडू-अनुराधा पंढरी सोळंकी (तलवारबाजी)
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2022-23 : गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- अमर भिमराव खराटे (आटयापाटया), गुणवंत पुरुष खेळाडू-अजय विजय पहुरकर (जिम्नस्टिक), गुणवंत महिला खेळाडू- ऐश्वर्या श्रीकृष्ण भोंडे (फुटबॉल), गुणवंत दिव्यांग खेळाडू-शुभम दिनकर अवचार (ॲथलॅटिक्स)
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24: गुणवंत क्रीडापटु(पुरुष) - नयन प्रदीप सरडे (ॲथलॅटिक्स), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-अक्षय दिलीप गोलांडे (तलवारबाजी), थेट पुरस्कार-मानव गणेश जाधव (धर्नुविद्या).
पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन, दि. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलढाणा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी कळविलेले आहे.
0 Comments