जिजाऊ सावित्रीच्या गौरवशाली इतिहासातून भारतीय महिलांना प्रेरणा मिळते-आमदार सिद्धार्थ खरात

 

vidarbhadoot kharat

मेहकर-  पैनगंगा नगर  येथे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, व शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मेहकर विधानसभा मतदारसंघाचे  नवनिर्वाचित आमदार या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते  ऍड अनंतराव वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष भाऊ रहाटे, शिवसेना शहर प्रमुख  किशोर भाऊ गारोळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी सेवा दलाचे राज्य सरचिटणीस शैलेश बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे निसार अन्सारी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ऍड विजय मोरे, ऍड विष्णू सरदार व्यसपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, व सावित्रीबाई फुले पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काटकर सर यांनी केले तर यावेळी जिजाऊ सावित्री  जयंती वर बोलताना  आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले स्वराज्य व्हावे  हे स्वप्न  राजमाता जिजाऊंनी बघितले  त्यासाठी  त्यांनी शिवबाला खडतर प्रवास घडवून स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केले  त्याचप्रमाणे  महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना  शिक्षणाचे धडे देऊन  महिला शिक्षणाची द्वारे उघडली त्यामुळे जिजाऊ सावित्रीच्या गौरवशाली इतिहासातून महिलांना प्रेरणा मिळते असे गौरव उद्गार आमदार सिद्धार्थ खरात यांनी काढले. यावेळी  अध्यक्षपदावरून बोलताना श्याम उमाळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांवर  संस्कार घडवून  स्वराज्याची निर्मिती  करून गोरगरिबांचे राज्य निर्माण  करणाऱ्या जिजाऊ राष्ट्रसाठी आदर्श ठरल्या. सावंत्री बाई फुले यांनी बिकट परिस्थितीत मुलींना शिक्षण दिल्या मुळे देशातील महिला शिक्षित बनून राष्ट्र मजबूत करण्याचे काम त्यानी केले असे प्रतिपादन श्याम भाऊ उमाळकर यांनी केले. यावेळी छोटू भाई गवळी, नारायण इंगळे, दादाराव खरात,यादवराव वानखेडे, बबन गायकवाड, अशोक गवई,दिलीप कंकाळ भाऊ, सरकटे भाऊ डॉ दिलीप खिल्लारे,अनिल म्हस्के साहेब, किशोर क्षीरसागर, दिलीप डोंगरेदिवे,राजेश धोटे भाऊ दिलीप सुपेकर दादाराव रामभाऊ खरात,भगवान खरात,सुदर्शन नेमाडे,शिवाजी सरोदे,सिद्धार्थ गवई अमर गवई,ऋतिक सरोदे,ऋषिकेश सरकटे,राहुल वानखेडे,निखिल बोरकर,शुभम साबळे,सिद्धोधन वानखेडे,सुमित खरात,आशुतोष तेलंग आकाश साबळे , प्रतीक देबाजे, बिटू तेलंग इत्यादी मान्यवर प्रामुख्याने हजर होते. या कार्यक्रमाला  महिलांची उपस्थिती लक्षणीय होती  या कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन  प्रा. संजय वानखेडे यांनी केले तर आभार  आकाश अवसरमोल यांनी मानले.



 

Post a Comment

0 Comments